Smitas corner
भारतीय पारंपारिक आहार सामान्यतः निरोगी आणि स्वादिष्ट आहे. याव्यतिरिक्त, पारंपरिक पोष्टिक आणि आहार शास्त्राच्या दृष्टिने तयार केला आहे जे फक्त शरीरासाठीच नव्हे मनाच्या आणि आधात्मिक आरोग्यासाठी देखिल अत्यंत फायदेशीर आहे.
पारंपारिक आहाराचे फायदे
भारतीय पारंपारिक आहारामध्ये सामान्यतः स्थानिक फळे, भाज्या, धान्ये, कडधान्ये, मसाले आणि दूध यांचा समावेश होतो जे चांगले पोषण आणि निरोगी जीवन जगण्यास मदत करतात.
ज्यांचा आहार बरोबर असतो त्यांना औषधाची गरज भासत नाही आणि जे लोक आहार बरोबर न घेता औषध उपचार करतात त्यांना औषधाचा ही फायदा होत नाही. भारतीय आहार पद्धती ही एक श्रेष्ठ आहार पद्धती आहे. यामध्ये आपण औषधी गुणधर्म असलेल्या आहार देखील घेत असतो. आणि याच कारणाने हि आहार पद्धती उत्तम मानली जाते.
आहार हेच
औषध
डोकेदुखी पासून आराम मिळवण्यासाठी काळी मिरी फायदेशीर आहे. तसेच सर्दी खोकला तसेच वातावरणाच्या बदलामुळे शरीरात तयार होणारे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी काळीमिरी फायदेशिर आहे.
वजन कमी करण्यासाठी तसेच मलावरोध सोबत पोटाच्या समस्या आणि त्वचेचा तजेलदारपणा आणण्यासाठी आपण कोथिंबीर पावडर आहारात घेतो.
सर्दी, जुनाट सर्दी, क्षयरोगाचा खोकला, भरलेली छाती, कफ, दमा तसेच अपचन, भुक न लागणे, पोटात गॅस धरणे, उलटी तसेच दाध दुखिवर आले दाढेत धरल्यावर आराम मिळतो.
Since 2020
पारंपारिक खाद्यपदार्थ हे असे खाद्यपदार्थ आणि व्यंजन आहेत जे पिढ्यापिढ्या बनवले जातात किंवा अनेक पिढ्यांपासून ते बनवून सेवन केले जात आहेत. आणि अश्याच पारंपरिक पदार्थामुळे आपले पुर्वज 100 वर्ष निरोगी आयुष्य जगायचे. परंतु या धावपळीच्या युगात आपण फास्ट फूड आणि मॉडर्न जीवन पद्धतीच्या युगात आपण हे सर्व पदार्थ विसरत आहोत.
पारंपरिक पदार्थ आणि घरगुती उपाय बद्दल माहिती साठी आपण smitas corner ला जुडून रहा.
पारंपपारिक आहारामध्ये लाकडी घाण्याच्या तेलाचे महत्व आहे. लाकडी घाणा (कोल्ड प्रेस ऑइल) म्हणून ओळखले जाणारे तेल हे एक तेल आहे जे कोल्ड प्रेसिंगद्वारे काढले जाते. या प्रक्रियेत बिया किंवा फळे कमी तापमानात आणि कमी दाबाने घाण्यातून काढली जातात. हे तेल पोषक गुणधर्मांनी समृद्ध असून त्याचे अनेक फायदे आहेत:
- निरोगी त्वचेसाठी : लाकडी घाण्याचे तेल त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. त्यात व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट पोषक तत्व असतात जे त्वचा मऊ आणि चमकदार ठेवतात.
- हृदयाचे आरोग्य: लाकडी घाण्याचे तेल हे हायपोअल्कोहोलिक असते जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते.
- केसांसाठी : लाकडी घाण्याचे तेल हे केसांसाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई केस मजबूत करते आणि त्यांना तुटण्यापासून प्रतिबंधित करते.
- पचनसंस्था : लाकडी घाण्याचे तेल पचनसंस्था सुधारते.
- आहारात लाकडी घाण्याचे तेल हे अति उत्तम असून आहारात बदल करायचा असेल तर त्याची सुरवात बदलायचे असेल तर रिफाईंड ऑईल खाणे बंद करून घाण्याचे तेल आहारात घ्यावे.