खोबऱ्याच्या पोळ्या कश्या बनवतात आणि त्या साठी कुठले साहित्य लागेल हे सर्व सविस्तर जाणून घेणार आहोत
*साहित्य* :-
ओल्या नारळाचा खिस दोन वाट्या, गूळ एक वाटी, जायफळ-वेलदोडे पावडर एक टी स्पून, भिजवलेली कणिक आवश्यकतेनुसार, तेल गरजेनुसार.
*कृती* :-
ओल्या नरळात गूळ घालून शिजवून घ्या. जायफळ, वेलदोडे पावडर घाला. छान मिक्स करा. घट्ट गोळा होऊ द्या. मिश्रण गार करून घ्या.
कणकेची पारी करून त्यात खोबऱ्याचे सारण भरा.
तेल लावून लाटा आणि लाटण्याच्या साहाय्याने तव्यावर पोळी टाकून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. तुपाबरोबर खायला द्या.
+ तेल लावून लाटता येत नसेल तर पोळी पीठावर लाटा.
+ नेहमीच्या पोळ्यांपेक्षा वेगळा प्रकार आहे. चवीला खूप छान लागतात.
+ पीठात हळद घातल्यास पोळ्यांना छान रंग येतो.