साहित्य :-
सुक्या खोबऱ्याचा कीस चार वाट्या, खारकेची पावडर दोन वाट्या, खसखस पाव वाटी, डिंक दीड वाटी, गोडंब्या आवडीनुसार, बेदाणे-काजू- बदामाचे काप आवडीनुसार, साखर दोन वाट्या, साजूक तूप गरजेनुसार, वेलदोडे, जायफळ पावडर दीड टी स्पून.
कृती :-
तुपात डिंक तळून घ्या. काजू, बेदाणे, बदामाचे काप, गोडंब्या तळून घ्या. राहिलेल्या तुपात खारकेची पावडर परतून घ्या.
कढईत खसखस, सुकं खोबरे भाजून घ्या. साखरेत निम्मे पाणी घालून एकतारी पाक करून घ्या.
डिंक हातांनी कुस्करून घ्या. इतर सर्व साहित्य एकत्र करा. त्यातच वेलची, जायफळ पावडर घालून मिक्स करा. हे मिश्रण पाकात घाला. मिश्रण घट्ट झाल्यावर लाडू बांधा.
- या लाडूमध्ये साखरेऐवजी गूळ वापरला तरी चालेल.