नारळाच्या रसातील शेवया

साहित्य :-

तांदळाचे पीठ दोन वाट्या, नारळाचं दूध चार वाट्या, गूळ एक वाटी, वेलची पावडर एक टी स्पून, मीठ चवीनुसार, तूप एक टी स्पून.

कृती :-

दोन वाट्या पाणी तापायला ठेवा. त्यात मीठ, तूप घाला. उकळी आल्यावर तांदळाचे पीठ घालून चांगले एकजीव करून घ्या. झाकून वाफ येऊ द्या. नंतर काढून चांगले मळून घ्या. हा मळलेला गोळा शेवेच्या सोऱ्यात घालून चाळणीवर शेवया पाडा. भांड्यात पाणी तापवा. त्यावर चाळण ठेवून शेवया शिजवून घ्या.
नारळाच्या दुधात गूळ विरघळवून घ्या. त्यात वेलची पावडर घाला. शिजवलेल्या तांदुळाच्या शेवया या दुधात घाला आणि सर्व्ह करा.

  • हा पदार्थ कोकणातील पारंपरिक आहे. गौरीला नैवेद्य दाखवण्यासाठी खूपच छान लागतो.

Leave a Comment