साहित्य :-
तांदळाचे पीठ दोन वाटी, ओल्या नारळाचा चव दोन वाटी, गूळ एक वाटी, वेलदोडे पावडर एक टी स्पून, भाजलेली खसखस दोन टी स्पून, काजू- बदामाचे काप आवडीनुसार, मीठ चवीनुसार, तेल एक टी स्पून.
कृती :-
दोन वाट्या पाणी तापवा. त्यात मीठ, तेल घाला. उकळी आल्यावर तांदळाचे पीठ घाला. छान मिक्स करून उकड काढून घ्या. नंतर पीठ चांगले मळून घ्या.
नारळाचा चव, गूळ एकत्र करून शिजवून घ्या. त्यात खसखस, वेलदोडे पावडर, काजू, बदामाचे काप घालून सारण तयार करून घ्या.
तयार पीठाच्या पाऱ्या करून त्यात सारण भरून मोदक करून मोदक पात्रात ठेवून वाफवून घ्या. साजूक तुपाबरोबर मोदक सर्व्ह करा.
- उकडीचे मोदक हा कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे. गणपतीच्या नैवेद्याला मोदकांचे महत्त्व आहे.