ऋषीपंचमीची भाजी

साहित्य :-

लाल भोपळा, दुधी भोपळा, पडवळ, दोडका प्रत्येकी दोन वाट्या चिरलेल्या भाज्या, ताजे चवळीचे दाणे अर्धी वाटी, आमसुलं १० ते १२, गूळ अर्धी वाटी, मोठं मीठ चवीनुसार, चिरलेल्या हिरव्या मिरच्या ८ ते १०, लोणी एक वाटी, खोवलेला ओला नारळ एक वाटी.

कृती :-

जाड भांड्यात अर्धी वाटी लोणी तापवा. त्यात मिरच्या घाला. सर्व भाज्या, मीठ, गूळ, आमसुलं घालून मिक्स करा. झाकून वाफ येऊ द्या. नंतर राहिलेलं लोणी, ओलं खोबरं घालून परत भाजी छान शिजवून घ्या. नाचणीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते.

  • पारंपरिक ऋषीपंचमीची भाजी आहे. सर्व वेलींच्या भाज्यांची ही भाजी आहे.
  • पौष्टिक होते व एकावेळेस सर्व भाज्या खाल्ल्या जातात.

Leave a Comment