कैरीची उडदमेथी

साहित्य :-

कैरीच्या फोडी एक वाटी, ओला नारळ अर्धी वाटी, लाल तिखट एक टी स्पून, हळद व हिंग प्रत्येकी पाव टी स्पून, मीठ व गूळ चवीनुसार.

मसाल्यासाठी –

तांदूळ १ टी स्पून, मेथी दाणे अर्धा टी स्पून, लाल मिरच्या चार, धने एक टी स्पून, जिरे अर्धा टी स्पून, मोहरी अर्धा टी स्पून, मिरे चार, तेल पाव वाटी, काळी उडीद डाळ १ चमचा.

कृती :-

मसाल्याचे सर्व साहित्य कढईत घेऊन कोरडे भाजून घ्या. गार झाल्यावर त्यात ओलं खोबरं घालून बारीक वाटून घ्या.
भांड्यात तेल तापवा. हिंग, हळद, घाला. कैरीच्या फोडी घालून परतून घ्या. झाकून वाफ येऊ द्या. नंतर वाटलेला मसाला मीठ, मिरची पावडर, गूळ घालून गरजेनुसार पाणी घाला. शिजवून घ्या. आंबट-गोड चवीची उडद मेथी भाताबरोबर खायला द्या.

  • कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे. खूप खमंग होते.

Leave a Comment