साहित्य :-
गव्हाचा रवा एक वाटी, गव्हाचे जाडसर पीठ एक वाटी, मीठ चवीनुसार, साजूक तूप अर्धी वाटी, शिजवलेली तूरडाळ एक वाटी, हिंग-हळद प्रत्येकी अर्धा टी स्पून, पिठीसाखर आवडीनुसार.
कृती :-
गव्हाचा रवा, पीठ, मीठ एकत्र करा. त्यात तूप गरम करून घाला. हातांनी चांगले चोळा. नंतर पाण्याने घट्ट मळून घ्या. अर्धा तास ठेवा. नंतर गोल गोल चपटे (बट्ट्या) करून घ्या. पॅनमध्ये तूप घाला. त्यावर हे बट्ट्या लावा. झाकण लावून मंद आचेवर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
शिजवलेल्या तुरडाळीत हिंग, हळद मीठ घालून घट्ट वरण करून घ्या.
तयार बट्ट्या बाऊलमध्ये मोडून घ्या. त्यावर वरण, तूप, पिठीसाखर घाला आणि गरम गरम खायला द्या.
- खानदेशातील हा पारंपरिक पदार्थ आहे..
- ज्यांना तिखट पाहिजे असेल ते वरणाच्याऐवजी आमटी करतात आणि गोड पाहिजे असल्यास भरपूर तूप व पिठीसाखर घालून खाता येते.
- पौष्टिक आहे. चवीला खूप छान लागतो.
- ‘वन डिश मील’ हा पदार्थ आहे.