नाचणीची आंबील

साहित्य :-

नाचणीचे पीठ अर्धी वाटी, ताक दोन वाट्या, लसूण चार पाकळ्या, जिरे एक टी स्पून, मीठ चवीनुसार, चिरलेली कोथिंबीर आवडीनुसार, पाणी एक लीटर.

कृती :-

भांड्यात पाणी तापायला ठेवा. त्यात मीठ घाला. उकळी आल्यावर नाचणीच्या पिठात पाणी घालून घोळ करा. हे मिश्रण उकळलेल्या पाण्यात घाला. शिजवून घ्या.
गार झाल्यावर त्यात ताक घाला. लसूण, जिरे वाटून घाला. कोथिंबीर घाला. छान थंडगार करून प्यायला द्या.

  • नाचणीची आंबील उन्हाळ्यात रोज प्यायला देतात.
  • नाचणी थंड असते. तसेच त्यात लोह, कॅल्शियम भरपूर असते. एक ग्लास आंबील पिल्यास पोटभर होते.

Leave a Comment