हळीवाचे लाडू

साहित्य :-

खोवलेला ओला नारळ चार वाट्या, चिरलेला गूळ दोन वाट्या, हळीव एक वाटी, वेलदोडे- जायफळ पावडर एक टी स्पून, साजूक तूप अर्धी वाटी, खारकेचे तुकडे अर्धी वाटी, काजू-बेदाणे- बदामाचे काप आवडीनुसार.

कृती :-

हळीव भाजून भिजवून ठेवा. तुपात खारीक परतून घ्या. काजू, बेदाणे, बदामाचे काप परतून घ्या. राहिलेल्या तुपात नारळ परतून घ्या. गूळ घालून मिक्स करा. मध्ये हळीव घाला. झाकून वाफ येऊ द्या. नंतर त्यात खारकेचे तुकडे, इतर साहित्य, वेलची पावडर, जायफळ पावडर घालून एकजीव करा. मिश्रण कोरडे झाले की गॅस बंद करा. मिश्रण कोमट झाल्यावर लाडू बांधा.

  • या लाडूमधून भरपूर आयर्न, कॅल्शियम मिळते.
  • सर्वांनीच हा लाडू थंडीच्या दिवसात रोज खावेत. हळीव उष्ण असतात त्यामुळे शरीराला उष्णता मिळते. त्याचबरोबर ताकदही मिळते.
  • एक लाडू आणि ग्लासभर दूध घेतल्यास पौष्टिक नाश्ता होतो.

Leave a Comment