बाजरीची भाकरी खा आणि निरोगी रहा.(Bajra and its 5 health benefits)

बाजरीची भाकरी,बाजरीचे मुख्य गुण,बाजरीचे आरोग्याला होणारे फायदे,Bajra Health Benefits in marathi,बाजरी पासून बनवता येणारे पदार्थ.

आपल्या आहाराला परिपूर्ण बनवणारे एक कडधान्य म्हणजे बाजरी. या कडधान्याचा समावेश हा आपल्या आहारात असला पाहिजे. याचे अनेक वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवता येतात, जे आपण पुढे पाहूच. भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रात पिकणारे हे कडधान्य आपल्या आहाराचा एक परिपूर्ण घटक होऊ शकतो. त्यामुळे हा ब्लॉग पूर्ण वाचा व बाजरीचा आहारात समावेश करा, तुमचे शरीर तुम्हाला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही.

बाजरीची भाकरी,Bajra Health Benefits in marathi

बाजरीचे मुख्य गुण

अत्यंत चविष्ट असणारे असे हे धान्य आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात विटामिन्स आणि खनिजे आहेत जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी व शरीराची कार्यक्षमता सुरळीत ठेवण्यासाठी उपयोगी आहे.
बाजरी मध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन विटामिन्स खनिजे असल्यामुळे आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते.


या कडधान्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळून येते ज्यामुळे आपली पचन व्यवस्था सुधारण्यास मदत होते.
बाजरीचा आहारात समावेश केल्यामुळे आपले दात आणि हाडे मजबूत होतात याचे कारण की यामध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.
फक्त एवढेच नाही तर बाजरीचा आहारात समावेश केल्याने अनेक आजारांपासून आपली सुटका होते ज्यामध्ये मधुमेह हार्ट रोग हे देखील समाविष्ट आहेत.
म्हणून तर आपले पूर्वज या कडधान्याचा उपयोग पिढ्यानपिढ्या करत आले आहेत. बाजरी मध्ये फक्त पोषक तत्त्वे उपलब्ध नसून ते खायला देखील अतिशय चविष्ट आहे म्हणून बाजरीचा वापर तुम्ही आहारात अवश्य करा.

बाजरी मध्ये असणारे पोषकतत्व

व्हिटॅमिन्स –

बाजरी मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स उपलब्ध असतात. विशेष करून व्हिटॅमिन बी हे बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात आहे. तसेच व्हिटॅमिन बी1 , बी 2,बी 3,बी6 सुद्धा उपलब्ध असतात. हे सर्व व्हिटॅमिन्स आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असतात.

मिनरल्स –

बाजरी मध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आणि फॉस्फरस यांचा समावेश असतो ज्याचा आपल्या दात आणि हाडांसाठी उपयोग होतो.

बाजरीचे आरोग्याला होणारे फायदे

दात आणि हाडांसाठी उपयुक्त


बाजरी मध्ये उपलब्ध असलेले कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक आपल्या दातासाठी आणि हाडांसाठी उपयुक्त असतात.ते हाडांची झीज होऊ देत नाहीत, ज्यामुळे हाडे ठिसूळ बनत नाहीत व मजबूत राहतात.

पाचन व्यवस्था सुधारते


भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे बाजरी मुळे आपली पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे पोटाचे अनेक विकार कमी होतात. गॅस ऍसिडिटी कब्ज यासारख्या त्रासांपासून आपली मुक्तता होते.

मधुमेह आणि वजन नियंत्रण


बाजरीच्या सेवनाने आपली रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. ज्यामुळे आपल्याला मधुमेहासारख्या आजारापासून मुक्तता मिळते. त्याचबरोबर आपल्या शरीरात ऊर्जेचे प्रमाण संतुलित ठेवल्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

हृदयासाठी खूप उपयुक्त


बाजरी मध्ये असलेल्या पोषक तत्त्वांमुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. बाजरीमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो व हृदयाचे इतर आजार देखील होण्याची शक्यता खूप कमी होते.

शरीरातील एनर्जी मध्ये वाढ


विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट ने भरपूर असलेल्या बाजरी मुळे आपल्याला दिवसभर एनर्जी ने युक्त असल्यासारखे वाटते. त्यामुळे शरीराला रोगांशी लढण्यासाठी ताकद मिळते. त्याचबरोबर निरोगी त्वचा व केसांसाठी बाजरी खूप उपयोगी असते.

बाजरी पासून बनवता येणारे पदार्थ

बाजरीची भाकरी


बाजरीची भाकरी चवीला अतिशय स्वादिष्ट असते. बनवायला अतिशय सोपी असल्यामुळे ही झटपट बनते व ते आपण दही चटणी किंवा मिरचीच्या ठेचा सोबत सुद्धा खाऊ शकतो.

बाजरीची भाकरी

बाजरीची खिचडी


अनेक जण बाजरीच्या खिचडी चा उपयोग संतुलित आहार म्हणून करतात. या खिचडी मुळे आपली पाचन व्यवस्था सुधारते. खिचडी बनवताना आपण वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या आणि तूप घालून एक ही खिचडी बनवू शकतो.

बाजरीची कढी


तुम्हाला जर एकदम चटपटीत आणि वेगळे काहीतरी आहारात समाविष्ट करावे असे वाटत असेल तर तुम्ही बाजरीची कढी बनवून त्याचा वापर करू शकता. बाजरीच्या पिठाचा उपयोग करून ही कढी बनवली जाते ज्यामध्ये मसाले आणि दही मिक्स केले जाते.

बाजरीचे लाडू


चविष्ट आणि पौष्टिक असणारे बाजरीचे लाडू तुम्ही बनवून खाऊ शकता. यामध्ये तुम्ही बाजरीचे पीठ गूळ आणि तूप वापरून लाडू बनवू शकता.

महत्त्वाचे

बाजरीचे प्रमाण हे अतिशय जास्त प्रमाणात करू नये. खूप जास्त प्रमाणात बाजरी खाल्ल्यास पोटांच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते.
बाजरीचे पदार्थ बनवत असताना ते व्यवस्थित बनवावे जसे की भाकरी खिचडी लाडू मगच ते खावे.
बाजरी सोबत इतर पौष्टिक भाज्या दही यांचा वापर करावा.
जर बाजरी खाल्ल्यामुळे एखाद्याला एलर्जी झाली तर बाजरी खाणे त्वरित बंद करावे.
एखाद्या व्यक्तीला जर मोठा आजार असेल किंवा एखाद्या आजाराची ट्रीटमेंट सुरू असेल तर आपल्या डॉक्टरांना विचारूनच बाजरीचा आहारात समावेश करा.

अशा प्रकारे बाजरीचा आहारात समावेश केल्यास आपल्याला दिवसभर ताजेतवाने, एनर्जीने युक्त व एकदम फ्रेश वाटेल. यामध्ये असणाऱ्या विटामिन्स मिनरल्स आणि इतर पोषक तत्त्वांमुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा होईल. लक्षात ठेवा बाजरीच्या सेवनाने आपले हाडे दात आणि पाचन व्यवस्था मजबूत होते. म्हणून स्वादिष्ट आणि चविष्ट असणाऱ्या बाजरीचा आपल्या आहारात वेगवेगळ्या प्रकारे बनवून समावेश करा व निरोगी आयुष्याचा आनंद घ्या.

आपल्याला हे दिखील वाचायला आवडेल

कमरेच्या मसल्स मध्ये आहेत खूप वेदना तर करा ही योगासने वेदना होतील गायब

‘या’ उपायांमुळे पांढरे केसही होऊ लागतील पहिल्यासारखे काळेभोर

सर्वांगीण आरोग्यासाठी करा ज्ञान मुद्रा. आश्चर्यचकित करणारे फायदे येतील समोर

रात्री झोप व्यवस्थित येत नाही, तर या पोषक तत्वांची कमी असू शकते.

4 thoughts on “बाजरीची भाकरी खा आणि निरोगी रहा.(Bajra and its 5 health benefits)”

Leave a Comment