*साहित्य* :-
तीळ दोन वाट्या, गुळ दीड वाटी, तूप दोन टी स्पून, पाणी अर्धी वाटी, सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी, वेलची पावडर एक ते दीड टी स्पून.
*कृती* :-
तीळ खमंग भाजून घ्या. एक वाटी तिळाचा कूट करून घ्या.
कढईत तूप, गूळ, पाणी घाला. विरघळून घ्या. दोन तारी पाक करा. त्यात भाजलेले तीळ, तिळाचा कूट, वेलची पावडर घाला. छान मिक्स करा. ओट्याला आधीच तेल लावून ठेवा. त्यावर हे घट्ट झालेले मिश्रण ठेवा. लाटण्याने लाटून घ्या. वर सुक्या खोबऱ्याचा कीस पसरवून दाबून घ्या. सुरीने वड्या कापा.
+ या वड्यांमध्ये शेंगदाणे एक वाटी घातल्यास चांगली खमंग चव येते. शिवाय वडी पौष्टिक होते.