खोबऱ्याची वडी

साहित्य :-

ओल्या नारळाचा खिस दोन वाट्या, साखर एक वाटी, दूध एक वाटी, साय अर्धी वाटी, वेलची पावडर एक टी स्पून, तूप एक टी स्पून.

कृती :-

कढईत तूप घाला. त्यावर नारळाचा किस परतून घ्या. साखर, दूध, साय सर्व एकत्र घाला. छान मिक्स करा. . शिजवत ठेवा. घट्ट गोळा होईपर्यंत शिजवा. वेलची पावडर घालून एकजीव करा. मिश्रण कडेला सुटायला लागल्यावर तूप लावलेल्या ताटात काढून थापून घ्या. लगेच वड्या पाडा.

  • या मिश्रणात पिवळा किंवा केशरी रंग घातल्यास वड्या छान दिसतात. वरून काजूचे काप लावा.

Leave a Comment