आंब्याच्या रसातील मोदक

साहित्य :-

तांदळाचे पीठ एक वाटी, आंब्याचा रस अर्धी वाटी, पाणी एक वाटी, मीठ चिमूटभर, तूप एक टी स्पून, सारणासाठी खोवलेला नारळ दोन वाट्या, गूळ एक वाटी, भाजलेली खसखस एक टी स्पून, काजू- बेदाणे-बदामाचे काप-चारोळे आवडीनुसार, वेलची पावडर एक टी स्पून.

कृती :-

सारणाचे सर्व साहित्य एकत्र करा. शिजवून घ्या. भांड्यात पाणी, आंब्याचा रस, मीठ घ्या. उकळून घ्या. त्यात पीठ घालून उकड काढा. झाकून वाफ येऊ द्या. नंतर मिश्रण चांगले मळून घ्या. त्याच्या पाऱ्या करा. सारण भरून मोदक करा. उकडून घ्या. साजूक तुपाबरोबर खायला द्या. किंवा नारळाच्या दुधासोबत पण छान लागतात.

  • आंब्याच्या रसामुळे छान केशरी कलर येतो. चव चांगली लागते.
  • आंब्याचा रस जास्त हवा असल्यास तयार मोदकावर आंब्याचा रस घालून खायला द्या.

Leave a Comment