गव्हाची खीर (हुग्गी)

साहित्य :-

सडलेले गहू दोन वाट्या, सुवासिक तांदूळ अर्धी वाटी, गूळ तीन वाट्या, गोडंब्या पाव वाटी, काजू-बदामाचे काप-बेदाणे आवडीनुसार, भाजलेली खसखस तीन टी स्पून, सुक्या खोबऱ्याचे काप पाव वाटी, खोवलेले ओले खोबरे एक वाटी, वेलदोडे – जायफळ पावडर एक टी स्पून, मीठ चवीनुसार, जाडसर बडिशेप पावडर अर्धा टी स्पून.

कृती :-

गहू रात्रभर भिजत ठेवा. नंतर कुकरमध्ये गहू व तांदूळ धुऊन घाला. पाणी घालून कुकरला तीन शिट्या द्या.
नंतर गव्हाच्या मिश्रणात गूळ व गरजेनुसार गरम पाणी घालून चांगले गरगटून घ्या. उकळी आल्यावर त्यात सुक्या खोबऱ्याचे काप, खसखस, ओल खोबर, गोडंब्या, काजू, बेदाणे, बदामाचे काप घालून चांगले शिजवून घ्या. नंतर बडिशेप, वेलदोडे, जायफळ घालून मिक्स करा.
साजूक तूप आणि दूधाबरोबर खीर खायला द्या.

  • ही खीर खूपच पौष्टिक होते. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी ही खीर नेहमी खावी.
  • कर्नाटकात या खिरीला हुग्गी असे म्हणतात.

Leave a Comment