साहित्य :-
गव्हाचे पीठ एक वाटी, डाळीचे पीठ एक टी स्पून, मीठ चवीनुसार, जाडसर वाटलेला ओवा अर्धा टी स्पून, जाडसर वाटलेले जिरे अर्धा टी स्पून, हिंग- हळद प्रत्येकी पाव टी स्पून, तीळ एक टी स्पून, तेल गरजेनुसार.
कृती :-
गव्हाच्या पीठात इतर सर्व साहित्य एकत्र करा. दोन चमचे तेल घाला. मिश्रण घट्ट मळून घ्या. अर्धा तास ठेवा. नंतर लिंबाएवढा गोळा घेऊन लाटा. तव्यावर थोडसं तेल लावून भाजून घ्या. चटणी, लोणच्याबरोबर खायला द्या.
- या दशम्या प्रवासात खूप छान आहेत..
- चांगल्या टिकतात, चवीला खूप छान लागतात. पोटभरीचा पदार्थ होतो.