दिवशे

साहित्य :-

तांदळाचे पीठ एक वाटी, पाणी एक वाटी, मीठ चवीनुसार, तेल गरजेनुसार, तयार अंड्याची बुर्जी किंवा उसळ आवडीनुसार.

कृती :-

पाणी उकळा. त्यात मीठ, तांदळाचे पीठ घालून मिक्स करा. झाकून एक वाफ येऊ द्या. नंतर काढून पाणी लावून चांगले मळून घ्या. या उकडीच्या पाऱ्या करून त्याला उभट वाटीचा आकार द्या. चाळणीवर ठेवून मोदकाप्रमाणे वाफवून घ्या.
नंतर काढून त्या वाटीत अंड्याची बुर्जी किंवा आवडीची कुठलीही उसळ, भाजी भरा आणि गरम गरम खायला द्या.

  • हा बेळगावकडचा पारंपरिक पदार्थ आहे.
  • डिलिव्हरी झालेल्या महिलांसाठी पौष्टिक व उपयुक्त आहे.

Leave a Comment