नाचणीची आंबील

साहित्य :- नाचणीचे पीठ अर्धी वाटी, ताक दोन वाट्या, लसूण चार पाकळ्या, जिरे एक टी स्पून, मीठ चवीनुसार, चिरलेली कोथिंबीर आवडीनुसार, पाणी एक लीटर. कृती :- भांड्यात पाणी तापायला ठेवा. त्यात मीठ घाला. उकळी आल्यावर नाचणीच्या पिठात पाणी घालून घोळ करा. हे मिश्रण उकळलेल्या पाण्यात घाला. शिजवून घ्या.गार झाल्यावर त्यात ताक घाला. लसूण, जिरे वाटून … Read more

कैरीची उडदमेथी

साहित्य :- कैरीच्या फोडी एक वाटी, ओला नारळ अर्धी वाटी, लाल तिखट एक टी स्पून, हळद व हिंग प्रत्येकी पाव टी स्पून, मीठ व गूळ चवीनुसार. मसाल्यासाठी – तांदूळ १ टी स्पून, मेथी दाणे अर्धा टी स्पून, लाल मिरच्या चार, धने एक टी स्पून, जिरे अर्धा टी स्पून, मोहरी अर्धा टी स्पून, मिरे चार, तेल … Read more

ऋषीपंचमीची भाजी

साहित्य :- लाल भोपळा, दुधी भोपळा, पडवळ, दोडका प्रत्येकी दोन वाट्या चिरलेल्या भाज्या, ताजे चवळीचे दाणे अर्धी वाटी, आमसुलं १० ते १२, गूळ अर्धी वाटी, मोठं मीठ चवीनुसार, चिरलेल्या हिरव्या मिरच्या ८ ते १०, लोणी एक वाटी, खोवलेला ओला नारळ एक वाटी. कृती :- जाड भांड्यात अर्धी वाटी लोणी तापवा. त्यात मिरच्या घाला. सर्व भाज्या, … Read more

ज्वारीच्या पिठाचे उप्पीट

साहित्य :- ज्वारीचे पीठ एक वाटी, जिरे-मोहरी-कढिपत्ता फोडणीसाठी, तिखट-मीठ चवीनुसार, तेल अर्धी वाटी, चिरलेला कांदा एक, चिरलेली कोथिंबीर, खोबरं आवडीनुसार. कृती :- कढईत तेल तापवा. त्यात जिरे, मोहरी, कढिपत्ता, कांदा घाला. परतून घ्या. ज्वारीचे पीठ घाला. थोडे भाजून घ्या. तिखट, मीठ घाला. एकजीव करा. पाणी शिंपडून वाफेवर शिजवून घ्या.नंतर वरून खोबरं, कोथिंबीर घालून गरमगरम खायला … Read more

खानदेशी वरण बट्ट्या

साहित्य :- गव्हाचा रवा एक वाटी, गव्हाचे जाडसर पीठ एक वाटी, मीठ चवीनुसार, साजूक तूप अर्धी वाटी, शिजवलेली तूरडाळ एक वाटी, हिंग-हळद प्रत्येकी अर्धा टी स्पून, पिठीसाखर आवडीनुसार. कृती :- गव्हाचा रवा, पीठ, मीठ एकत्र करा. त्यात तूप गरम करून घाला. हातांनी चांगले चोळा. नंतर पाण्याने घट्ट मळून घ्या. अर्धा तास ठेवा. नंतर गोल गोल … Read more

दिवशे

साहित्य :- तांदळाचे पीठ एक वाटी, पाणी एक वाटी, मीठ चवीनुसार, तेल गरजेनुसार, तयार अंड्याची बुर्जी किंवा उसळ आवडीनुसार. कृती :- पाणी उकळा. त्यात मीठ, तांदळाचे पीठ घालून मिक्स करा. झाकून एक वाफ येऊ द्या. नंतर काढून पाणी लावून चांगले मळून घ्या. या उकडीच्या पाऱ्या करून त्याला उभट वाटीचा आकार द्या. चाळणीवर ठेवून मोदकाप्रमाणे वाफवून … Read more

दशम्या

साहित्य :- गव्हाचे पीठ एक वाटी, डाळीचे पीठ एक टी स्पून, मीठ चवीनुसार, जाडसर वाटलेला ओवा अर्धा टी स्पून, जाडसर वाटलेले जिरे अर्धा टी स्पून, हिंग- हळद प्रत्येकी पाव टी स्पून, तीळ एक टी स्पून, तेल गरजेनुसार. कृती :- गव्हाच्या पीठात इतर सर्व साहित्य एकत्र करा. दोन चमचे तेल घाला. मिश्रण घट्ट मळून घ्या. अर्धा … Read more

उकडीचे मोदक

साहित्य :- तांदळाचे पीठ दोन वाटी, ओल्या नारळाचा चव दोन वाटी, गूळ एक वाटी, वेलदोडे पावडर एक टी स्पून, भाजलेली खसखस दोन टी स्पून, काजू- बदामाचे काप आवडीनुसार, मीठ चवीनुसार, तेल एक टी स्पून. कृती :- दोन वाट्या पाणी तापवा. त्यात मीठ, तेल घाला. उकळी आल्यावर तांदळाचे पीठ घाला. छान मिक्स करून उकड काढून घ्या. … Read more

गव्हाची खीर (हुग्गी)

साहित्य :- सडलेले गहू दोन वाट्या, सुवासिक तांदूळ अर्धी वाटी, गूळ तीन वाट्या, गोडंब्या पाव वाटी, काजू-बदामाचे काप-बेदाणे आवडीनुसार, भाजलेली खसखस तीन टी स्पून, सुक्या खोबऱ्याचे काप पाव वाटी, खोवलेले ओले खोबरे एक वाटी, वेलदोडे – जायफळ पावडर एक टी स्पून, मीठ चवीनुसार, जाडसर बडिशेप पावडर अर्धा टी स्पून. कृती :- गहू रात्रभर भिजत ठेवा. … Read more

हळीवाचे लाडू

साहित्य :- खोवलेला ओला नारळ चार वाट्या, चिरलेला गूळ दोन वाट्या, हळीव एक वाटी, वेलदोडे- जायफळ पावडर एक टी स्पून, साजूक तूप अर्धी वाटी, खारकेचे तुकडे अर्धी वाटी, काजू-बेदाणे- बदामाचे काप आवडीनुसार. कृती :- हळीव भाजून भिजवून ठेवा. तुपात खारीक परतून घ्या. काजू, बेदाणे, बदामाचे काप परतून घ्या. राहिलेल्या तुपात नारळ परतून घ्या. गूळ घालून … Read more